भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे गिळिले हो संसारें । कांहीं तरि राखा खरें । दिला करुणाकरें । मनुष्यदेह सत्संग

are gilile ho sansaren | kanhin tari rakha kharen | dila karunakaren | manushyadeh satsang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अरे गिळिले हो संसारें । कांहीं तरि राखा खरें । दिला करुणाकरें । मनुष्यदेह सत्संग ॥१॥ येथें न घलीं न घलीं आड । संचितसा शब्द नाड । उठाउठीं गोड । बीजें बीज वाढवी ॥ध्रु.॥ केलें ते क्रियमाण । झालें तें संचित म्हण । प्रारब्ध जाण । उरवरीत उरले तें ॥२॥ चित्त खोटें चालीवरी । रोग भोगाचे अंतरीं । रसने अनावरी । तुका म्हणे ढुंग वाहे ॥३॥