भजनी मालिका
← भजनांकडे परत

अर्भकाचे साठी । पंतें हातीं धरिली पाटी

arbhakache sathi | panten hatin dharili pati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अर्भकाचे साठी । पंतें हातीं धरिली पाटी ॥१॥ तैसे संत जगीं । क्रिया करुनी दाविती अंगीं ॥ध्रु.॥ बालकाचे चाली । माता जाणुनि पाउल घाली ॥२॥ तुका म्हणे नाव । जनासाठी उदकीं ठाव ॥३॥