भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटीं पारिख्या

apulyacha bhot chati | mari karantin parikhya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटीं पारिख्या ॥१॥ ऐसें जन भुललें देवा । मिथ्या हेवा वाढवी ॥ध्रु.॥ गळ गिळी आमिशे मासा । प्राण आशा घेतला ॥२॥ तुका म्हणे बोकड मोहो । धरी पहा हो खाटिकाचा ॥३॥