भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलीच दारा जरी टेके व्यभिचार । क्रोधाचा थारा अंतरीं नये

apulich dara jari teke vyabhichar | krodhacha thara antarin naye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आपुलीच दारा जरी टेके व्यभिचार । क्रोधाचा थारा अंतरीं नये ॥१॥ आपुलेंच धन तस्करें नेतां जाण । जयांचें मन उद्विग्र नव्हे ॥२॥ आपुलाची पुत्र वधोनि जाय शत्रु । परी मोहाचा पाझरु नेत्रीं नये ॥३॥ आपुलें शरीर गांजितां परनरें । परी शंतींचें घर चळो नेदी ॥४॥ एका जनार्दनीं जया पूर्ण बोधू । तोचि एक साधु जगामाजीं ॥५॥