भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुली पूजा आपण करावी । ही जंव ठावी राहटीं नाहीं

apuli puja apan karavi | hi janv thavi rahatin nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आपुली पूजा आपण करावी । ही जंव ठावी राहटीं नाहीं ॥१॥ कासया ती पूजा जाणिवेचा शीण । त्याहुनी अज्ञान बरा दिसे ॥२॥ एका जनार्दनीं ज्ञानाज्ञानें । पुजावें श्रीचरण विठोबाचे ॥३॥