भजनी मालिका
← भजनांकडे परत

अपराधी म्हणोनि येतों काकुलती । नाहीं तरी होती काय चाड

aparadhi mhanoni yeton kakulati | nahin tari hoti kay chad

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अपराधी म्हणोनि येतों काकुलती । नाहीं तरी होती काय चाड ॥१॥ येईल तारूं तरी तारा जो जी देवा । नाहीं तरी सेवा घ्यावी भार ॥ध्रु.॥ कासया मी आतां वंचूं हे शरीर । आहें बारगीर जायजणें ॥२॥ तुका म्हणे मन करूनि मोकळें । आहें साळेंढाळें उदार तें ॥३॥