भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुपम्य वास पंढरीस ज्याचा । धन्य तो दैवाचा अनुपम्य

anupamya vas pandharis jyacha | dhanya to daivacha anupamya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनुपम्य वास पंढरीस ज्याचा । धन्य तो दैवाचा अनुपम्य ॥१॥ अनुपम्य घडे चंद्रभागे स्नान । अनुपम्य दान नाम वाचे ॥२॥ अनुपम्य घडे क्षेत्र प्रदक्षिणा । अनुपम्य जाणा नारीनर ॥३॥ अनुपम्य सोहळा नित्य दिवाळी । अनुपम्य वोवाळी विठोबासी ॥४॥ अनुपम्य शरण एका जनार्दनीं । अनुपम्य ध्यानीं एक नाम ॥५॥