भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुपम्य सप्तपुर्‍याअ त्या असती । अनुपम्य त्या वरती पंढरीये

anupamya saptapur‍yaa tya asati | anupamya tya varati pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनुपम्य सप्तपुर्‍याअ त्या असती । अनुपम्य त्या वरती पंढरीये ॥१॥ अनुपम्य तीर्थ सागरादि असती । अनुपम्य सरती पंढरीये ॥२॥ अनुपम्य देव उदंडे असती । अनुपम्य विठलमूर्ति पंढरीये ॥३॥ अनुपम्य संत वैष्णवांचा मेळ । अनुपम्य गदारोळ पंढरीये ॥४॥ अनुपम्य शरण एका जनार्दनी । अनुपम्य चिंतनीं डुल्लतसे ॥५॥