भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनुपम्य भाग्य नांदतें पंढरी । विठ्ठल निर्धारीं उभ जेथें

anupamya bhagya nandaten pandhari | viththal nirdharin ubh jethen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आनुपम्य भाग्य नांदतें पंढरी । विठ्ठल निर्धारीं उभ जेथें ॥१॥ अनुपम्य वाहे पुढें चंद्रभागा । दोषा जातीं भंगा नाम घेतां ॥२॥ अनुपम्य मध्यें पुंडलीके मुनी । अनुपम्य चरणीं मिठी त्याच्या ॥३॥ संत शोभती दोही बाहीं । अनुपम्य देहीं सुख वाटे ॥४॥ अनुपम्य एका जनार्दनीं ठाव । अनुपम्य पंढरीराव विटेवरी ॥५॥