भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुभवें नाम गाताती गणिका । मोक्षपद देखा प्राप्त जालें

anubhaven nam gatati ganika | mokshapad dekha prapta jalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनुभवें नाम गाताती गणिका । मोक्षपद देखा प्राप्त जालें ॥१॥ उलट्या अक्षरी वाल्हा तो तरला । उद्धार तो केला चोखियाचा ॥२॥ यातीसी संबंध नाही नामस्मरणीं । जपोत पैं कोणी आदरें नाम ॥३॥ जनार्दनीं एका सांगतसे खूण । श्रीरामनाम पुर्ण सोडूं नये ॥४॥