भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरींची ज्योती प्रकाशली दीप्ति । मुळींची जे होती आच्छादिली

antarinchi jyoti prakashali dipti | mulinchi je hoti achchhadili

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अंतरींची ज्योती प्रकाशली दीप्ति । मुळींची जे होती आच्छादिली ॥१॥ तेथींचा आनंद ब्रम्हांडीं न समाये । उपमेशीं काये देऊं सुखा ॥ध्रु.॥ भावाचे मथिलें निर्गुण संचलें । तें हें उभें केलें विटेवरी ॥२॥ तुका म्हणे आम्हां ब्रम्हांड पंढरी । प्रेमाची जे थोरी सांठवण ॥३॥