भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंकावरी घेउनी खेळवी नानापरी । मोहाची तो थोरी ऐशी आहे

ankavari gheuni khelavi nanapari | mohachi to thori aishi ahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अंकावरी घेउनी खेळवी नानापरी । मोहाची तो थोरी ऐशी आहे ॥१॥ वडील ती स्त्री येऊनियां पाहे । राजअंकी आहे कोण बाळ ॥२॥ सापत्न तो भाव धरुनियां पोटी । पदें तया लोटी अंकावरुनी ॥३॥ रडत रडत तेथोनी निघाला । एका जनार्दमीं आला माता जेथें ॥४॥