भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकांच्या घातें । ज्यांचीं निवतील चित्तें

anikanchya ghaten | jyanchin nivatil chitten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणिकांच्या घातें । ज्यांचीं निवतील चित्तें ॥१॥ ते चि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ध्रु.॥ कान पसरोनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥२॥ तुका म्हणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा॥३॥