भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण । मुंढा वांयां मारगेली वांयां हांसे जन

anikan upadeshun nenen nachon apan | mundha vanyan marageli vanyan hanse jan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण । मुंढा वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥१॥ तैसा नव्हे चाळा आवरीं मन डोळा । पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ध्रु.॥ बाहिरल्या वेषें आंत जैसे तैसे । झाकलें तों बरें पोट भरे तेणें वेसें ॥२॥ तुका म्हणे केला तरी करीं शुद्ध भाव । नाहीं तरी जासी वांयां हा ना तोसा ठाव ॥३॥