भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिक तें आम्हां न दिसे प्रमाण । कीर्तनावांचून आनु नेणों

anik ten amhan na dise praman | kirtanavanchun anu nenon

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आणिक तें आम्हां न दिसे प्रमाण । कीर्तनावांचून आनु नेणों ॥१॥ राम कृष्ण हरि विठ्ठल उच्चार । करुं हा गजर वाहुं टाळी ॥२॥ आनंदे नामावळी गाऊं पैं कीर्तनीं । श्रुतीं टाळ घोळ लाऊनी गजरेंसी ॥३॥ एका जनार्दनीं हाचि आम्हां छंदा । वाऊगा तो ढंग न करुं कांहीं ॥४॥