भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणीक कोणाचा न करीं मी संग । जेणें होय भंग माझ्या चित्ता

anik konacha na karin mi sang | jenen hoy bhang majhya chitta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणीक कोणाचा न करीं मी संग । जेणें होय भंग माझ्या चित्ता ॥१॥ विठ्ठलावांचूनि आणीक जे वाणी । नाइकें मी कानीं आपुलिया ॥ध्रु.॥ समाधानासाठी बोलावी हे मात । परि माझें चित्त नाहीं कोठें ॥२॥ जिवाहूनि मज ते चि आवडती । आवडे ज्या चित्तीं पांडुरंग ॥३॥ तुका म्हणे माझें तोचि जाणे हित । आणिकांच्या चित्त नेदीं बोला ॥४॥