भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणीक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासुनियां

anik dusaren maj nahin atan | nemilen ya chittapasuniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणीक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासुनियां ॥१॥ पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनीं । जाग्रतीं स्वप्नीं पांडुरंग ॥ध्रु.॥ पडिलें वळण इंद्रियां सकळां । भाव तो निराळा नाहीं दुजा ॥२॥ तुका म्हणे नेत्रीं केलें ओळखण । साजिरें तें ध्यान विटेवरी ॥३॥