भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगीं घेऊनियां वारें दया देती । तया भक्ता हातीं चोट आहे

angin gheuniyan varen daya deti | taya bhakta hatin chot ahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अंगीं घेऊनियां वारें दया देती । तया भक्ता हातीं चोट आहे ॥१॥ देव्हारा बैसोनि हालविती सुपें । ऐसीं पापी पापें लिंपताती ॥ध्रु.॥ एकी बेकी न्यायें होतसे प्रचित । तेणें लोक समस्त भुलताती ॥२॥ तयाचे स्वाधीन दैवतें असती । तरी कां मरती त्यांचीं पोरें ॥३॥ तुका म्हणे पाणी अंगारा जयाचा । भक्त कान्होबाचा तो ही नव्हे ॥४॥