भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगीं देवी खेळे । कां रे तुम्हासी न कळे । कोणाचे हे चाळे । सुख दुःख न मनितां

angin devi khele | kan re tumhasi na kale | konache he chale | sukh duhkh na manitan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अंगीं देवी खेळे । कां रे तुम्हासी न कळे । कोणाचे हे चाळे । सुख दुःख न मनितां ॥१॥ मीं तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं । पालटाचा घेई । भाव खरें लोपे ना ॥ध्रु.॥ आपुलाले तुम्ही पुसा । सोवा पेव्याच सरिसा । थिरावल्या कैसा काय । जाणों विचार ॥२॥ तुका म्हणे लाभकाळ । तेथें नसावें शीतळ । मग तैशी वेळ । कोठें जाते सांपडों ॥३॥