भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगीं चंदनाची उटी । माथां शोभे मयोरवेटी

angin chandanachi uti | mathan shobhe mayoraveti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अंगीं चंदनाची उटी । माथां शोभे मयोरवेटी ॥१॥ शंख चक्र पद्म करीं ।उभा विटेवरी श्रीहरीं ॥२॥ भोवतें उभे सनकादिका । नारद तुंबरादि आणिक ॥३॥ ऐसा आनंद सोहळा । एका जनार्दनी पाहे डोळां ॥४॥