भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगीकार ज्याचा केला नारायणें । निंद्य तें हि तेणें वंद्य केलें

angikar jyacha kela narayanen | nindya ten hi tenen vandya kelen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अंगीकार ज्याचा केला नारायणें । निंद्य तें हि तेणें वंद्य केलें ॥१॥ अजामेळ भिल्ली तारीली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य केली ॥ध्रु.॥ ब्रम्हहत्याराशी पातकें अपार । वाल्मीक किंकर वंद्य केला ॥२॥ तुका म्हणे येथें भजन प्रमाण । काय थोरपण जाळावें तें ॥३॥