भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगी भरला ताठा । नये वळणी जैसा खुंटा

angi bharala tatha | naye valani jaisa khunta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अंगी भरला ताठा । नये वळणी जैसा खुंटा ॥१॥ कैसें न कळे त्या डेंगा । हित आदळलें अंगा ॥ध्रु.॥ जीव जाते वेळे । भल्या कडे ताठी डोळे ॥२॥ मुसळाचें अनु । तुका म्हणे नव्हे धनु ॥३॥