भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनाथाचा नाथ पतित पावन । ब्रीद सत्य जाण करितसे

anathacha nath patit pavan | brid satya jan karitase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनाथाचा नाथ पतित पावन । ब्रीद सत्य जाण करितसे ॥१॥ अनंत भक्तांचें अनंते धांवणे । वाढविलें तेणें नामासाठीं ॥२॥ एका जनार्दनीं भक्ताचा अंकित । हाकेसरसा त्वरित उडी घाली ॥३॥