भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंत नामाचा हा काला । पुराणें म्हणते पाहुं चला

anant namacha ha kala | puranen mhanate pahun chala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनंत नामाचा हा काला । पुराणें म्हणते पाहुं चला ॥१॥ हरिनामाचा कवळू घेतां। तेणें धालों पैअ सर्वथा ॥२॥ एका कवळासाठीं । गणीका बैसविली वैकुंठीं ॥३॥ एका जनार्दनीं कवळ । सेवुं जाणती ते प्रेमळ ॥४॥