भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदें निर्भर नाम गावें वाचे । तेणें कळिकाळाचें भय नाहीं

ananden nirbhar nam gaven vache | tenen kalikalachen bhay nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आनंदें निर्भर नाम गावें वाचे । तेणें कळिकाळाचें भय नाहीं ॥१॥ नामाचें सामर्थ्य कळिकाळ वंदी माथां । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ॥२॥ यज्ञ योग जप तप नामें सर्व सिद्धि । वायां तूं उपाधी गुंतूं नको ॥३॥ एका जनार्दनीं नाम भवांचें तारक । निश्चियेंसी देख गाये वाचे ॥४॥