भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदें कीर्तन कथा करीं घोष । आवडीचा रस प्रेमसुख

ananden kirtan katha karin ghosh | avadicha ras premasukh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आनंदें कीर्तन कथा करीं घोष । आवडीचा रस प्रेमसुख ॥१॥ मज या आवडे वैष्णवांचा संग । तेथें नाहीं लाग कळिकाळा ॥ध्रु.॥ स्वल्प मात्र वाचे बैसलासे निका । राम कृष्ण सखा नारायण ॥२॥ उच्चांरितां मज दुजें वाटे लाज । उपदेशें काज आन नाहीं ॥३॥ तुका म्हणे मन रंगलेंसे ठायीं । माझें तुझ्या पायीं पांडुरंगा ॥४॥