भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदें एकांतीं प्रेमें वोसंडत । घेऊं अगणित प्रेमसुख

ananden ekantin premen vosandat | gheun aganit premasukh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आनंदें एकांतीं प्रेमें वोसंडत । घेऊं अगणित प्रेमसुख ॥१॥ गोप्य धन वारा लागों यास । पाहों नेदूं वास दुर्जनासी ॥ध्रु.॥ झणी दृष्टि लागे आवडीच्या रसा । सेवूं जिरे तैसा आपणासी ॥२॥ तुका म्हणे हें बहु सकुमार । न साहावे भार वचनाचा ॥३॥