भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनादि सांवळा देखियेला डोळां । मनु माझा वेधिला सांगु काय

anadi sanvala dekhiyela dolan | manu majha vedhila sangu kay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनादि सांवळा देखियेला डोळां । मनु माझा वेधिला सांगु काय ॥१॥ जीवाविरहित जालें देह हारपलें । शिवपणें गुंतलें गुरुकृपें ॥२॥ जें शब्दासी नातुडे वैखरीयेसी कानडें । तें रुप उघडे पंढरीयें ॥३॥ एका जनार्दनीं जीवींचे जीवन । विठ्ठल निधान विटेवरी ॥४॥