भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुप जोडल्या सुखाचिया रासी । पार त्या भाग्यासी नाहीं आतां

amup jodalya sukhachiya rasi | par tya bhagyasi nahin atan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमुप जोडल्या सुखाचिया रासी । पार त्या भाग्यासी नाहीं आतां ॥१॥ काय सांगों सुख झालें आलिंगन । निवाली दर्शनें कांति माझी ॥२॥ तुका म्हणे यांच्या उपकारासाठी । नाहीं माझे गांठी कांहीं एक ॥३॥