भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुच्या हें आलें भागा । जीव्हार या जगाचें

amuchya hen alen bhaga | jivhar ya jagachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमुच्या हें आलें भागा । जीव्हार या जगाचें ॥१॥ धरूनियां ठेलों जीवें । बळकट भावें एकविध ॥ध्रु.॥ आणूनियां केला रूपा । उभा सोपा जवळी ॥२॥ तुका म्हणे अंकित केला । खालीं आला वचनें ॥३॥