भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुच्या बापाच्या पुण्याचिया राशी

amuchya bapachya punyachiya rashi

आमुच्या बापाच्या पुण्याचिया राशी । म्हणोनी जेविलासे त्याचे घरीं ॥१॥ तेव्हां तुज काय उपवास होते । म्हणोनी सांगातें जेविलेती ॥२॥ तईचा तूंचि देवा झालासि पारिखा । आम्हां कां सारिखा न धरसी ॥३॥ कर्ममेळा म्हणे तुज आमुची आण । आमुची निजखूण दावीं देवा ॥४॥