भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचिया भावें तुज देवपण । तें कां विसरोन राहिलासी

amuchiya bhaven tuj devapan | ten kan visaron rahilasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमुचिया भावें तुज देवपण । तें कां विसरोन राहिलासी ॥१॥ समर्थासी नाहीं उपकारस्मरण । दिल्या आठवण वांचोनियां ॥ध्रु.॥ चळण वळण सेवकाच्या बळें । निर्गुणाच्यामुळें सांभाळावें ॥२॥ तुका म्हणे आतां आलों खंडावरी । प्रेम देउनि हरी बुझवावें ॥३॥