भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुची जिवलगे सज्जन सोयरी । नांदतील तिरी भिंवरेच्या

amuchi jivalage sajjan soyari | nandatil tiri bhinvarechya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमुची जिवलगे सज्जन सोयरी । नांदतील तिरी भिंवरेच्या ॥१॥ तीच माझ्या चित्ती वसती दिवसराती । भेटावया खंती वाटतसे ॥धृ ॥. संपदा सोहळे सर्वसुख वसे । वैकुंठ नसें सूरवरासी ॥२॥ ज्याच्या नामे पाप दुःख नासे भय । विठ्ठल बाप मे रखुमाई ॥३॥ माझा जीव जातो अमृत तें कळा । कंठी वेळोवेळां ध्यात असे ॥४॥ तुका म्हणे वाट पाहतां शिणले । न त्या पंथे डोळुले पंढरीच्या ॥५॥