भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचे ठाउके तुम्हां गर्भवास । बळिवंत दोष केले भोग

amuche thauke tumhan garbhavas | balivant dosh kele bhog

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमुचे ठाउके तुम्हां गर्भवास । बळिवंत दोष केले भोग ॥१॥ काय हा सांगावा नसतां नवलावो । मैंदपणें भाव भुलवणेचा ॥ध्रु.॥ एका पळवूनि एका पाठी लावा । कवतुक देवा पाहावया ॥२॥ तुका म्हणे ज्याणें असें चेतविलें । त्याच्यानें उगळें कैसें नव्हे ॥३॥