भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमिश लाउनी मीनातें गोविती । तैसी संसारस्थिती जाण बापा

amish launi minaten goviti | taisi sansarasthiti jan bapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आमिश लाउनी मीनातें गोविती । तैसी संसारस्थिती जाण बापा ॥१॥ पान लागलिया गूळ न म्हणे गोड । नामामृतीं चाड न धरती ॥२॥ पाहती डोळां देखती प्रकार । परि विषयाचा आदर न सांडिती ॥३॥ माझें माझें म्हणोनि दृढ धरिताती । एका जनार्दनीं भोगिती चौर्‍यायंशीं ॥४॥