भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही उतराई । भाव निरोपोनि पायीं

amhi utarai | bhav niroponi payin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही उतराई । भाव निरोपोनि पायीं ॥१॥ तुम्ही पुरवावी आळी । करावी ते लडिवाळीं ॥ध्रु.॥ आमचा हा नेम । तुम्हां उचित हा धर्म ॥२॥ तुका म्हणे देवा । जाणों सांगितली सेवा ॥३॥