भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही घ्यावे तुझे नाम । तुम्ही आम्हां द्यावे प्रमे

amhi ghyave tujhe nam | tumhi amhan dyave prame

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही घ्यावे तुझे नाम । तुम्ही आम्हां द्यावे प्रमे॥१॥ ऐसे निवडिले मुळी । संतीं बैसोनि सकळीं ॥ध्रु माझी डोयी पायावरी । तुम्ही न धरावी दुरी ॥२॥ तुका म्हणे केला । खंड दोघांचा विठ्ठला ॥३॥