भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हांसे तो पुरे विठ्ठलाची एक । वाउगाची देखा दुजा न मनीं

amhanse to pure viththalachi ek | vaugachi dekha duja na manin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्हांसे तो पुरे विठ्ठलाची एक । वाउगाची देखा दुजा न मनीं ॥१॥ ध्यानीं धरुं विठ्ठल करुं तयाचें कीर्तन । आणिक चिंतन नाहीं दुजें ॥२॥ ध्येय ध्याता ध्यान खुंटला पैं शब्द विठ्ठ्ल उद्धबोध सुख आम्हां ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठल भरला । रिता ठाव उरला कोठें सांगा ॥४॥