भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां काही आम्हां काही । आतां नाही या बोले

amhan kahi amhan kahi | atan nahi ya bole

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां काही आम्हां काही । आतां नाही या बोले ॥१॥ मोल सांगा मोल सांगा । घेणें तीहीं गा पुसावें ॥ध्रु.॥ कैसें घडे कैसें घडे । बडबड तुज मज ॥२॥ मुद्दलेसाठीं मुद्दले साठीं । लाभ पोटी त्यामध्ये ॥३॥ तुका म्हणे साठवूं घरीं । आडल्या काळें पुसती तरी ॥४॥