भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां गांजी जन । तरि कां मेला नारायण

amhan ganji jan | tari kan mela narayan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां गांजी जन । तरि कां मेला नारायण ॥१॥ जालों पोरटीं निढळें । नाहीं ठाव बुड आळें ॥ध्रु.॥ आह्मीं जना भ्यावें । तरि कां न लाजिजे देवें ॥२॥ तुका म्हणे देश । जाला देवाविण ओस ॥३॥