भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां अराणूक संवसार हातीं । पडिली नव्हती आजीवरी

amhan aranuk sanvasar hatin | padili navhati ajivari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां अराणूक संवसार हातीं । पडिली नव्हती आजीवरी ॥१॥ पुत्रदाराधन होता मनी धंदा । गोवियेलों सदा होतों कामे ॥ध्रु.॥ वोढवले ऐसे दिसते कपाळ । राहिलों सकळ आवरोनि ॥२॥ मागे पुढे कांहीं न दिसे पाहातां । येथूनिया चिंता उपजली ॥३॥ तुका म्हणे वाट पाह्याचे कारण । येथींचिया हीन झाले भाग्य ॥४॥