भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां आपुलें नावडे संचित । चरफडी चित्त कळवळ्यानें

amhan apulen navade sanchit | charaphadi chitta kalavalyanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां आपुलें नावडे संचित । चरफडी चित्त कळवळ्यानें ॥१॥ न कळतां जाला खोळंब मारगा । जगीं जालों जगा बहुरूपी ॥ध्रु.॥ कळों आलें बरें उघडले डोळे । कर्णधार मिळे तरि बरें ॥२॥ तुका म्हणे व्हाल ऐकत करुणा । तरि नारायणा उडी घाला ॥३॥