भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमर तूं खरा । नव्हे कैसा मी दातारा

amar tun khara | navhe kaisa mi datara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अमर तूं खरा । नव्हे कैसा मी दातारा ॥१॥ चाल जाऊं संतांपुढें । वाद सांगेन निवाडें ॥ध्रु.॥ तुज नांव जर नाहीं । तर माझें दाव काई ॥२॥ तुज रूप नाहीं । तर माझें दाव काई॥३॥ खळसी तूं लीळा । तेथें मी काय वेगळा ॥४॥ साच तूं लटिका । तैसा मी ही म्हणे तुका ॥५॥