भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमंगळाचा अमंगळ वाण । न ये वाचे नारायण

amangalacha amangal van | na ye vache narayan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अमंगळाचा अमंगळ वाण । न ये वाचे नारायण ॥१॥ सदा सर्वकाळ परनिंदा करी । वाचे हरिहरी न म्हणे पापी ॥२॥ कस्तुरी उत्तम परि शेजार हिंगाचा । अमंगळासी साचा बोध नोहे ॥३॥ एका जनार्दनीं तयाची पैं गोष्टी । बोलणें चावटी परमार्थ नोहे ॥४॥