भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमची कां नये तुह्मासी करुणा । किती नारायणा आळवावें

amachi kan naye tuhmasi karuna | kiti narayana alavaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमची कां नये तुह्मासी करुणा । किती नारायणा आळवावें ॥१॥ काय जाणां तुह्मी दुर्बळाचें जिणें । वैभवाच्या गुणें आपुलिया ॥ध्रु.॥ देती घेती करिती खटापटा आणिकें । निराळा कौतुकें पाहोनियां ॥२॥ दिवस बोटीं आह्मीं धरियेलें माप । वाहातों संकल्प स्वहिताचा ॥३॥ तुका म्हणे मग देसी कोण्या काळें । चुकुर दुर्बळें होतों आह्मी ॥४॥