भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलिंगनालागीं उतावेळ मन । देखेन चरण विठोबाचे

alinganalagin utavel man | dekhen charan vithobache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आलिंगनालागीं उतावेळ मन । देखेन चरण विठोबाचे ॥१॥ मना समाधान मना समाधान । मना समाधान राहें मना ॥२॥ देखिलिया मूर्ति सांवळी सगुण । मन नाहीं बंधन मना तुज ॥३॥ एका जनार्दनीं मन आवारिलें । दृढ तें ठेविलें विठ्ठलपायीं ॥४॥