भजनी मालिका
← भजनांकडे परत

आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा जाली धणी

ali sinhasthaparvani | nhavya bhata jali dhani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा जाली धणी॥१॥ अंतरीं पापाच्या कोडी । वरीवरी बोडी डोई दाढी ॥ध्रु.॥ बोडिलें तें निघालें । काय पालटलें सांग वहिलें ॥२॥ पाप गेल्याची काय खुण । नाहीं पालटले अवगुण ॥३॥ भक्तीभावें विण । तुका म्हणे अवघा सीण ॥४॥