भजनी मालिका
← भजनांकडे परत

अलंकार जाहलेपणें । जेवीं असे निखळ सोनें

alankar jahalepanen | jevin ase nikhal sonen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अलंकार जाहलेपणें । जेवीं असे निखळ सोनें ॥१॥ नाम भिन्न रुप एक । देहीं देहात्मा तैसा देख ॥२॥ गोडी आणि गुळ । नोहे वेगळे सकळ ॥३॥ जीव शिव नामें भिन्न । एकपणें एकचि जाण ॥४॥ एका जनार्दनीं शरण । भेदरुपें दिसे भिन्न ॥५॥