भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंडित संतसंग । तेथें काय सुखा उणें मग

akhandit santasang | tethen kay sukha unen mag

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अखंडित संतसंग । तेथें काय सुखा उणें मग ॥१॥ माझे आलें अनुभवा । संतसेवा घडावी ॥२॥ हेंचि मागें आणिक नाहीं । संतसंग देई सर्वकाळ ॥३॥ एका जनार्दनीं धरुनि विश्वास । होईन त्यांचा दास जन्मोजन्मीं ॥४॥