भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकारवंत मूर्ती । जेव्हां देखेन मी दृष्टी

akaravant murti | jevhan dekhen mi drushti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आकारवंत मूर्ती । जेव्हां देखेन मी दृष्टी ॥१॥ मग मी राहेन निवांत । ठेवूनियां तेथें चित्त ॥ध्रु.॥ श्रुति वाखाणिती । तैसा येसील प्रचिती ॥२॥ म्हणे तुकयाचा सेवक । उभा देखेन सन्मुख ॥३॥